Crime Story : लग्नाच्या पहिल्याच रात्री नराधम पतीकडून पत्नीवर सामूहिक बलात्कार

spot_img

पाच मित्रांना बोलावून केलं अघोरी कृत्य; राष्ट्रीय महिला आयोगाची दखल, आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांना ७ दिवसांचा अल्टीमेटम

हैदराबादमधून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीच्या आयुष्याची पहिल्याच रात्री पतीकडून राखरांगोळी करण्यात आली. पोटच्या गोळ्याप्रमाणे रक्षण करणाऱ्या नवऱ्यानेच हनिमूनच्या रात्री आपल्या पत्नीला पाच नराधम मित्रांच्या हवाली केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेने केवळ तेलंगणाच नव्हे तर संपूर्ण देश हादरला असून, स्थानिक प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे लग्न २८ जुलै २०२५ रोजी एका २८ वर्षीय तरुणाशी झाले होते. लग्नाच्या पहिल्या रात्री आरोपी पतीने आपल्या पाच मित्रांना घरी बोलावून मद्यपानाची मेजवानी केली. पीडितेलाही बळजबरीने दारू पाजून बेशुद्ध करण्यात आले आणि त्यानंतर पतीसह त्याच्या पाच नराधम मित्रांनी तिच्यावर अमानुष अत्याचार केले. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने या घटनेला ‘विवाह संस्थेच्या पावित्र्याचे आणि स्त्रीच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन’ असे संबोधत, तेलंगणा पोलिसांना सात दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

बेगमपेट पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. सध्या सर्व आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. “पीडितेच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जावी आणि नराधमांना लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जाव्यात,” असे कडक आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिले आहेत. विधवा आई आणि लहान बहिणीसोबत राहणाऱ्या या पीडितेच्या न्यायासाठी आता संपूर्ण समाज आक्रमक झाला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ