Otur News : महाराष्ट्रसह परराज्यात धुमाकूळ घालणारी दुधानी टोळी पोलिसांच्या ताब्यात 

spot_img

ओतूर,प्रतिनिधी:दि.१३ जुलै [ रमेश तांबे ]

महाराष्ट्रासह परराज्यात आणि विविध जिल्ह्यांत जबरी चोरी, लूटमार, घरफोडी व सशस्त्र दरोडा टाकणारी सराईत कुख्यात दूधानी टोळी शिकलकरी गँगच्या सराईत सहा जणांच्या टोळीला पकडण्यात ओतूर पोलिसांना यश आले आहे. या आरोपींकडून पोलिसांनी पिस्टलसह चोरी करण्यासाठी वापरणारी कटावणी,कटर,पान्हे आदी विविध साहित्य जप्त केले आहे. या टोळीवर तेलंगणा राज्यामध्ये वेगवेगळे २५ गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील कोळवाडी येथे रविवारी ता.१२ रोजी सकाळी एका बोलोरो वाहनातून आलेल्या व्यक्तींबद्दल तसेच त्यांच्या हालचाली बद्दल येथील स्थानिक नागरिकांना संशय आल्याने,नागरिकांनी त्यांची व त्यांच्या त्यांच्याजवळ असलेल्या बोलेरो वाहनाबद्दल विचारपूस केली असता, त्या वाहनातील संशयित इसमानी नागरिकांवर दगडफेक केली तसेच त्यांच्याजवळ असलेल्या शस्त्रांचा धाक दाखवून घटनास्थळावरून पलायन केले. पैकी चौघां संशयीतांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सोनुसिंग पापसिंग दुधानी वय ३५, रा.हडपसर पुणे, जिलूसिंग शेरसिंग दुधानी वय ३८,रा.खोपोली, जि.रायगड,पंकजसिंग धारूसिंग शिकलकर वय ४० रा,आंबरनाथ,करणसिंग गगणसिंग टाक वय २७ रा.,जि.परभणी,मंगलसिंग मायासिंग दुधाने वय ६०,कृष्णासिंग साहेबसिंग टाक वय १८ दोघेही राहणार झरी,जि.परभणी अशी नागरिकांनी व पोलीसांनी पकडलेल्या सरायित गुन्हेगारांची नावे आहेत.

रविवारी सकाळी कोळवाडी येथील विघ्नेश घोलप यांना त्यांचे कोल्हार ता.राहुरी येथील नातेवाईक नातेवाईकांनी  त्यांची महिंद्रा बोलेरो एमएच-१७ एजे-३०७५ गाडी चोरीला गेल्याची सांगीतले.विघ्नेश घोलप हे रविवारी कामावर जात असताना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना नगर-कल्याण महामार्गावरील कोळवाडी येथे वडापावच्या हॉटेल समोर उभे असलेले बोलेरो वाहन ओळखीच्या नातेवाईकांचे असल्याचे दिसताच, घोलप यांनी सदर वाहनाची चावी काढून घेतली.तसेच सदर इसमांजवळ जाऊन पाहिले असता,त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या दरम्याने घोलप यांनी त्या इसमांकडे असलेल्या बोलेरो वाहनाबद्दल विचारपूस केली असता, संशयित इसमानी घोलप यांच्याबरोबर झटापट करून, येथील नागरिकांवर दगडफेक केली तसेच त्यांच्याजवळ असलेल्या शस्त्रांचा धाक दाखवून पलायन केले.यातील चौघांना मोठ्या शितापीने नागरिकांनी पकडले.मात्र उर्वरित इसमांनी गावठी कट्टे व इतर हत्यारांचा धाक दाखवत ग्रामस्थांना चकवा देऊन पलायन केले.दरम्यान या सर्व संशयित इस्मानकडे वेगवेगळी शस्त्रास्त्रे होती असे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.त्यामुळे ह्या व्यक्ती दरोडेखोर, लुटारू व अन्य सराईत गुन्हेगार असल्याची नागरिकांमध्ये व परिसरात चर्चा सुरू होती.

दरम्यान नागरिकांनी पकडलेल्या पकडलेल्या संशयित इसमांना ओतूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे गाडी चोरीच्या संशयित गुन्हेगारांच्या टोळीतील चौघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, तर हत्यारांचा धाक दाखवत इतर संशयित इसम पसार झाले आहे. फरार संशयित सर्व आरोपींना पोलिसांनी व ग्रामस्थांनी आलमे गावच्या परीसरात पकडले आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांनी धाडस दाखवत शेतात पाठलाग करून ताब्यात घेतले. 

त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता ताब्यातील संशयितांवर परराज्यातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखलअसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या बोलेरो वाहनातून विविध प्रकारची हत्यारे व चोरीसाठी वापरत असलेले साहित्य मिळाले आहे. या धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत असून, प्रसंगावधान राखून संशयितांना पकडणाऱ्या कोळवाडीच्या ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

घटनास्थळी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील,ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरिक्षक दत्तात्रय गुंड यांनी भेट दिली.तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक युवराज जाधव,पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे,योगेश उकर्डे,ज्योतीराम पवार,मनोज राठोड,दिनेश साबळे,सुभाष केदारी,रोहित बोबले,विशाल गोडसे यांनी शोधकार्य केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ