Central Railway : 15–20 मिनिटे उशीराने धावणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांची गैरसोय, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

spot_img

मुंबईतील सीएसएमटी येथे आज सकाळपासून सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी अनेक गाड्या स्थानकावरच थांबून राहिल्या असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्टेशन परिसरात आणि प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबईची लोकल रेल्वे ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी या सेवेवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत लोकल काही मिनिटे जरी उशिरा धावली, तरी त्याचा थेट परिणाम नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या वेळापत्रकावर होतो. आजही त्याचाच अनुभव प्रवाशांना घ्यावा लागत आहे. अनेक गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे कामावर जाणाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे.

मध्य रेल्वे मार्गावर गेल्या काही दिवसांपासून वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. तीन दिवसांत वेगवेगळ्या स्थानकांवर उद्भवलेल्या समस्यांमुळे रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

दरम्यान, सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडावर उपाययोजना करण्यासाठी रेल्वे कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. तांत्रिक समस्या लवकरात लवकर दूर करून सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. प्रवाशांनी संयम राखावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तरीही, ही अडचण लवकरात लवकर दूर करावी, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ