Baramati Election : सुनेत्रा वहिनींच्या विजयाचा श्रीनिवास पवारांना विश्वास; २०२९ च्या ‘पवार विरुद्ध पवार’ सामन्यावर मोठं विधान

spot_img

“भाजपला बदनाम कशाला करता, स्वतःचं डोकं चालवा”; श्रीनिवास पवारांचा राजकीय विरोधकांना टोला

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे आज बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार म्हणून मैदानात असून, संपूर्ण पवार कुटुंब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. २८ जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातानंतर बारामतीत निर्माण झालेली सहानुभूतीची लाट सुनेत्रा पवारांच्या पथ्यावर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना निकालाबाबत आणि भविष्यातील राजकीय समीकरणांवर भाष्य केले.

सुनेत्रा वहिनींच्या विजयाबद्दल बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले की, आता केवळ विजय महत्त्वाचा नसून तो किती मोठ्या मताधिक्क्याने होतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, २०२९ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा कौटुंबिक संघर्ष पाहायला मिळणार का? या प्रश्नावर त्यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली. “२०२९ ला काय चित्र असेल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. दादांचे असे अचानक जाणे होईल, हे कोणाला माहीत होते? येणाऱ्या तीन वर्षांत राजकीय परिस्थिती कशी असेल, कोण कोणासोबत असेल, हे सर्व प्रश्नचिन्हांकित आहे,” असे सांगत त्यांनी भविष्यातील शक्यता राखून ठेवल्या.

युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चेवर आणि भाजपवर होणाऱ्या आरोपांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “ज्यांचे कार्यकर्ते असतात, त्यांना आपल्या नेत्याने पुढे जावे असे वाटणे स्वाभाविक आहे,” असे सांगत त्यांनी युगेंद्र पवारांच्या इच्छेचा आदर केला. तसेच, भाजप पवार कुटुंबात फूट पाडत असल्याच्या आरोपांवर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. “भाजपला उगीच बदनाम करून काय उपयोग? पवार कुटुंब राजकारणात खूप जुनं आणि प्रगल्भ आहे, स्वतःचं डोकं वापरून निर्णय घेण्याची क्षमता आमच्याकडे आहे,” असे खडे बोल त्यांनी सुनावले. वहिनींना राजकारणात स्थिरावण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण निकालानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ