Bandra Demolition : ९०% काम फत्ते, पण ‘या’ कारणामुळे मुंबई पोलीस हायअलर्टवर!

spot_img

मुंबईतील वांद्रे पूर्व येथील गरीब नवाज नगर (गरीब नगर) परिसरातील अनधिकृत झोपड्यांवरील रेल्वेची अतिक्रमणविरोधी मोहीम आज चौथ्या दिवशीही सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल ९० टक्के झोपड्या पाडण्यात आल्या असून, आता केवळ १० टक्के काम शिल्लक राहिले आहे. मात्र, आज शुक्रवार (जुम्मा) असल्याने आणि नमाजच्या पार्श्वभूमीवर परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलीस कमालीचे सतर्क झाले आहेत. मशिदींच्या आसपास विशेष लक्ष ठेवण्यात आले असून, पुढील दोन दिवस महत्त्वाचे असल्याने पोलीस सूत्रांनी हायअलर्ट जारी केला आहे. स्थानिक आमदार आणि खासदारांनी या तोडक कारवाईवर उघड नाराजी व्यक्त केली असली, तरी परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ विनीत अभिषेक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, हे अतिक्रमण हटवल्यानंतर या मोकळ्या जागेचा वापर वांद्रे पूर्वेकडील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी आणि टर्मिनसकडे जाणारा रस्ता मोकळा करण्यासाठी केला जाईल. तसेच, १०० घरे पूर्णपणे पाडली जाणार नसून केवळ तळमजल्यावरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवली जात आहेत. दरम्यान, या मोहिमेदरम्यान झालेल्या दगडफेक आणि हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी सद्दाम अन्सारी नावाच्या आणखी एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्यावर पेव्हर ब्लॉकने पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप असून, त्याला वांद्रे न्यायालयात हजर केले जाईल. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या १५ आरोपींना न्यायालयाने २६ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ