spot_img

Tejas Thackeray : तेजस ठाकरेंवर उपचार सुरू,लेकाची काळजी घेण्यासाठी पत्नीसह उद्धव ठाकरे रुग्णालयात

spot_img

माजी मुख्यमंत्री, तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे.

तेजस ठाकरे यांच्यावर बुधवारपासून मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना गिरगांव येथील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू असून आता तब्येतीत सुधारणा झाल्याची माहिती मिळते आहे. रुग्णालयात तेजस ठाकरे यांची काळजी घेण्यासाठी रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे सध्या असल्याचे कळते. ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यांनीही तेजस ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली तसेच लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ