spot_img

Plane Crash  in Vijayapura Karnataka : कर्नाटकात प्रशिक्षण विमानाचा अपघात; शेतात कोसळले विमान, दोघे वैमानिक जखमी

spot_img

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर पुन्हा हादरवणारी घटना, DGCA कडून तपास सुरू

गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती. त्या घटनेनंतर आता कर्नाटकातील विजयापूर जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक विमान अपघात घडल्याने पुन्हा एकदा विमान सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

रेड बर्ड एव्हिएशन या प्रशिक्षण संस्थेचे सेसना 172 प्रकारचे प्रशिक्षण विमान कलबुर्गीहून बेळगावकडे जात असताना बबलेश्वर तालुक्यातील मंगळूरू गावाजवळ शेतजमिनीवर कोसळले. या अपघाताचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या अपघातात कॅप्टन कुणाल मल्होत्रा, जे सहाय्यक फ्लाइट इन्स्ट्रक्टर आहेत, तसेच प्रशिक्षणार्थी वैमानिक गौतम संकर (गौतम शंकर पी. आर.) हे दोघे जखमी झाले आहेत. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोघांची प्रकृती स्थिर असून त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे बीएलडीई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, विमानातील इंधन संपल्याने किंवा इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नियंत्रण सुटल्याने विमान शेतात कोसळले, उलटे झाले आणि काही अहवालांनुसार ते तीन तुकड्यांत तुटले. अपघातापूर्वी दोघांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर येत आहे.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली, तर पोलिस आणि प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, DGCA आणि विमानन विभागाने या अपघाताचा सखोल तपास सुरू केला असून नेमके कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ