वाराणसीच्या मंदिराने मृणालच्या आयुष्यात काय बदल घडवला?
अभिनेत्री मृणाल ठाकूरने नुकतीच एका मुलाखतीत आपले आयुष्य आणि त्यातील संघर्ष उघड केले. वाराणसीतील एका मंदिरात तिने अनुभवलेला आध्यात्मिक अनुभव तिला जीवन बदलून टाकणारा ठरला. मृणाल म्हणाली, “मी फक्त 30-40 सेकंद मंदिरात बसले होते. डोळे बंद केल्यावर माझ्या डोक्यात माझ्या वडिलांचा चेहरा, त्या मुलींचा चेहरा आणि ट्रेनमधून उडी मारण्याचा विचार येत होता. मात्र नंतर जेव्हा डोळे उघडले, त्या ऊर्जेने मला सांगितले की, तू हे सगळं पार केलंस आणि भविष्यात येणाऱ्या कठीण परिस्थितींचा सामना तू करू शकशील.”
मृणालच्या संघर्षाच्या काळात तिला अनेकदा आत्महत्येचा विचार आला होता. ती सांगते, “करिअरच्या सुरुवातीला मी अनेक ऑडिशन्स दिले, सतत नकार आला आणि माझ्यात काही विशेष नाही अशी भावना निर्माण झाली. तेव्हा अनेकदा ट्रेनमधून उडी मारण्याचा विचार मनात आला होता.”
मृणालने पत्रकारितेपासून आपला करिअर सुरू केला आणि नंतर मालिकांमधून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. आज ती हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहे आणि तिच्या मेहनतीमुळे यशस्वी वाटचाल केली आहे.




