spot_img

Sanjay Raut : अजित पवारांच्या निधनानंतर घडलेल्या राजकीय हालचालींवर राऊतांची टीका, भाजपवरही साधला निशाणा

spot_img

सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदावर संजय राऊतांचा घणाघात; “सूत्रं अमित शाहांच्या हातात” असा आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दुर्दैवी निधनानंतर अवघ्या दोन दिवसांत राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. आज त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत म्हणाले की, अजूनही संपूर्ण महाराष्ट्र अजित पवार यांच्या जाण्याच्या धक्क्यातून सावरलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती भाजपच्या पाठबळावर उपमुख्यमंत्री होत असेल, तर तो संबंधित पक्षाचा आणि कुटुंबाचा अंतर्गत विषय आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रेमागे कोणाची सूत्रं आहेत, यावर त्यांनी थेट बोट दाखवत “हा निर्णय अमित शाह (Amit Shah) यांनी घेतला असावा,” असा दावा केला.

राष्ट्रवादीमध्ये अनेक अनुभवी आणि राष्ट्रीय स्तरावरील नेते असताना अशा प्रकारचा निर्णय घेतला जातोय, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासारखे ज्येष्ठ नेते असताना हा निर्णय पक्षांतर्गत चर्चेतून झाला असावा, असा अंदाजही राऊतांनी व्यक्त केला.

भाजपवर टीका करताना त्यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. “भाजपला दुःख, संवेदना यांच्याशी काहीही देणंघेणं नाही. ते मढ्यावरच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण करतात,” असा घणाघात त्यांनी केला.

तसेच अजित पवार हयात असताना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये समन्वयाची शक्यता होती, असे शरद पवारांच्या विधानांतून जाणवत असल्याचंही राऊत म्हणाले. मात्र सध्या या विषयावर अधिक बोलणं योग्य नाही, असं सांगत त्यांनी भविष्यात योग्य वेळी यावर सविस्तर भूमिका मांडण्याचे संकेत दिले.

शिवसेना आणि भाजपमधील जुन्या राजकीय संघर्षाचाही त्यांनी उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव होता, पण उद्धव ठाकरे यांनी तो यशस्वीपणे हाणून पाडला, त्यामुळेच भाजप अजूनही नाराज असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ