spot_img

Anand Shinde on Ajit Pawar Death : गर्दीमुळे अजित दादांचं अंतिम दर्शन घेता आलं नाही; गायक आनंद शिंदे भावूक

spot_img

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र दु:खात बुडाला आहे. त्यांच्यावर बारामती या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी लाखोंच्या संख्येने लोकांची गर्दी झाली. प्रचंड गर्दीमुळे अनेकांना दादांचं अंतिम दर्शन घेता आलं नाही. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनाही अजित दादांना शेवटतं पाहता आलं नाही. अक्षरश: अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अंत्यसंस्कारस्थळी उपस्थित असताना आनंद शिंदे म्हणाले, “मला आता काही सुचत नाहीये. इतकी गर्दी आहे की मीसुद्धा आतमध्ये जाऊ शकलो नाही. हीच खेदाची गोष्ट आहे की इथे येऊन दादांना फक्त लांबून पाहिलं. त्यांचं दर्शन घेणंही शक्य झालं नाही.”

आनंद शिंदे आणि अजित पवार यांचे अनेक वर्षांचे चांगले आणि मैत्रीपूर्ण संंबंध होते. अनेक वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. आनंद शिंदे म्हणाले, “ज्या दादांसोबत मी बसलो, उठलो… कुणाचं काही काम असलं की मी डायरेक्ट दादांना फोन करायचो. ते नेहमी म्हणायचे, ‘ए शिंदेंना घेऊया. पण आज दादाच तिथे नाहीत म्हटल्यावर मला कोण फोन करून आतमध्ये घेणार?” राजकीय असो सामाजिक किंवा कलाविश्वात दादा सगळ्यांचे प्रिय होते. दादांचा लाडका अभिनेता सूरज चव्हाणही शेवटचं दर्शन घेण्यासाठी पोहोचला होता. मात्र त्यालाही दादांना पाहता आलं नाही. सूरजनं दादांच्या जळत्या चितेसमोर डोकं टेकवलं.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ