spot_img

Ajit Pawar Accident : अजित पवार यांच्या अपघाताचा थरारक CCTV व्हिडीओ आला समोर

spot_img

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाचा आज सकाळी (28 जानेवारी) बारामतीमध्ये भीषण अपघात झाला. या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजितदादा प्रचारासाठी बारामतीला जात होते. अशातच आता अजित पवार यांच्या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

महाराष्ट्र पंचायत निवडणुकीसाठीच्या चार सभांना उपस्थित राहण्यासाठी अजित पवार बारामतीला जात होते. अपघाताची माहिती मिळताच पवारांचे कुटुंबीय त्यांच्या मुंबईतील निवासस्थानावरुन रवाना झाले आहेत. बारामतीमध्ये मोठा जनसमुदाय लोटला असून पोलिसांना परिस्थिती हाताळण्यास घाम फुटत आहे.अपघातापूर्वी अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना झाला होता. विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांचं राणाजगजीतसिंह यांच्यासोबत बोलणं झालं होतं. मी नंतर फोन करतो म्हणत अजित पवार यांनी नंतर फोन करण्याचं आश्वसन दिलं होतं. त्यानंतर बारामतीत उतरल्यावर पुढील बोलणं होणार होतं पण त्याआधीच अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ