spot_img

Pune Crime : पुण्यात पोटच्या लेकाला आईने संपवलं,13 वर्षांच्या मुलीवरही केले वार

spot_img

पुण्याच्या वाघोली परिसरातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका महिलेनं स्वतःच्या पोटच्या ११ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केला आहे. तिने आपल्या १३ वर्षांच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला केला. मात्र ती थोडक्यात बचावली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. एका आईनेच आपल्या दोन मुलांवर अशाप्रकारे हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही भयंकर घटना वाघोली परिसरात उघडकीस आली आहे. एका आईने आपल्या ११ वर्षांच्या मुलाची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. एवढ्यावरच न थांबता तिने आपल्या १३ वर्षांच्या मुलीलाही संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्यामुळे तिचा जीव थोडक्यात वाचला आहे.

हा सर्व प्रकार पहाटेच्या शांततेत घडला. घरात सर्वजण झोपलेले असताना आरोपी आईने अचानक हे टोकाचे पाऊल उचलले. तिने धारदार शस्त्राने ११ वर्षांच्या मुलावर हल्ला केला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तिने आपल्या १३ वर्षांच्या मुलीवरही वार करण्यास सुरुवात केली.आई आपल्यावर हल्ला करत असल्याचे पाहून मुलगी प्रचंड घाबरली, मात्र तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळ काढला. तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. मुलीचा आवाज ऐकून शेजारी तातडीने मदतीला धावून आले, ज्यामुळे तिचे प्राण वाचू शकले. जखमी मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी आईला ताब्यात घेतले आहे. एका आईने आपल्याच मुलांचा जीव घेण्याचा प्रयत्न का केला? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार कौटुंबिक वादातून घडला की आई मानसिक तणावाखाली होती, याचा तपास पोलीस करत आहेत. वाघोली सारख्या अत्यंत गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या थरारक घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ