प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही म्हणून एका वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा थेट जाब विचारला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर अखेरीस गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव अनवधानाने राहिलं असेल, असं काही नाही. पण, तसा कोणताही हेतू नव्हता’ असं म्हणत महाजन याांनी दिलगिरी व्यक्त केली.
७७ वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये भाजपचे नेते आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. गिरीश महाजनांनी यावेळी भाषण केलं. पण, भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याने एका महिला पोलिसांनी महाजनांना जाब विचारला होता. या प्रकरणी गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिलगिरी व्यक्त केली. “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव अनवधानाने राहिलं असेल, असं काही नाही. पण, तसा कोणताही हेतू नव्हता. त्यावेळी मी घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम् , छत्रपती शिवाजी महाराज की जय ते बरोबर होतं. पण, अनवधानाने झालं असेल पण नाव डावलणे असा कोणताही हेतू नव्हता. मुद्यामहून नावं डावलण्याचा हेतू नव्हता, हवी तर माझी भाषणं एकदा काढून पाहा, जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतोय’ असं म्हणत महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली.




