spot_img

Karad Crime News : कराडच्या पोल्ट्री फार्ममध्ये DRI ची धाड,कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त

spot_img

कराड (Karad) तालुक्यातील पाचुपतेवाडी येथे पुण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (DRI) धाड टाकून ड्रग्ज बनवण्याचा एक मोठा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. एका कोंबड्यांच्या शेडमध्ये हा काळा बाजार सुरू होता. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज आणि कच्चा माल जप्त केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाचुपतेवाडी येथील एका निर्जन स्थळी असलेल्या कोंबड्यांच्या शेडमध्ये जानेवारी महिन्यापासून एमडी ड्रग्ज तयार केले जात होते. याबाबतची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीआरआयने अत्यंत गुप्तपणे ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार बाबा मोरे याच्यासह एकूण चार जणांना ताब्यात घेतलं आहे. या ठिकाणाहून अंदाजे ७ ते ८ कोटी रुपयांचा तयार माल आणि मोठ्या प्रमाणात ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

जप्त केलेल्या कच्च्या मालातून जर एमडी ड्रग्ज तयार झाले असते, तर त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत हजारो कोटी रुपये इतकी असती. मात्र, डीआरआयच्या पथकाने वेळेत धाड टाकून हा मोठा कट उधळून लावला. या ठिकाणची यंत्रसामग्री आणि कच्चा माल बघून तपास पथकही चक्रावून गेलं. या कारवाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इतकी मोठी धाड पडेपर्यंत सातारा आणि कराड पोलिसांना याची पुसटशी कल्पनाही नव्हती. हे पथक थेट गुजरात आणि हैदराबादवरून आलं असल्याचं समजते. एनडीपीएस कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, तपासाची गोपनीयता राखण्यासाठी स्थानिक यंत्रणेला दूर ठेवण्यात आले असावे, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ