spot_img

Shivsena Symbol Case : आजही शिवसेना धनुष्यबाण निकाल रखडणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर अनिश्चिततेचे सावट

spot_img

ॲड. असीम सरोदे यांच्या पोस्टमुळे सुनावणी पुढे ढकलली जाण्याची शक्यता वाढली

शिवसेनेतील फूटीनंतर सुरू असलेल्या सत्तासंघर्ष प्रकरणाचा निकाल आज लागेल अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता आता कमी झाली आहे. शिवसेना मूळ पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा लांबणीवर जाण्याचे संकेत मिळत आहेत.

उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडणारे वकील ॲड. असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आज सुनावणी होणार नाही, असा अंदाज व्यक्त केला आहे. न्यायालयाच्या वेळापत्रकामुळे शिवसेना प्रकरणासाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या प्रकरणाचा निर्णय आणखी काही दिवस प्रतीक्षेत राहण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ