spot_img

Aga Aga Sunbai Kai Mhantai Sasubai : पडद्यावर सासूबाई, प्रत्यक्षात कोण आहे निर्मिती सावंत यांची सून?

spot_img

सिनेमाच्या यशानंतर निर्मिती सावंत यांच्या कौटुंबिक आयुष्याची रंगली चर्चा

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जाऊ बाई जोरात’, ‘नवरा माझा नवसाचा’ यांसारख्या अनेक विनोदी चित्रपटांतून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. छोट्या पडद्यावर ‘कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक’, ‘हप्ता बंद’ आणि ‘कॉन्स्टेबल कामना कामतेकर’ या मालिकांमधील त्यांच्या भूमिका आजही लक्षात राहणाऱ्या ठरल्या आहेत.

‘झिम्मा’ चित्रपटातील त्यांच्या धमाल भूमिकेनंतर आता ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ आणि सध्या चर्चेत असलेल्या ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या सिनेमात त्या सासूबाईंच्या भूमिकेत झळकत आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, निर्मिती सावंत आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची सासू-सून जोडी विशेष लोकप्रिय ठरत आहे.

दरम्यान, या सिनेमाच्या यशानंतर निर्मिती सावंत यांच्या प्रत्यक्ष आयुष्यातील सुनेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत अभिनय क्षेत्रात सक्रिय असून त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनय याने पूर्वा पंडित हिच्याशी लग्न केले आहे.

पूर्वा पंडित सोशल मीडियावर सासू निर्मिती सावंत यांच्यासोबतचे खास फोटो शेअर करत असते, ज्यामुळे दोघींच्या नात्यातील जिव्हाळा अनेकदा चाहत्यांच्या नजरेत भरतो. व्यवसायाच्या दृष्टीने पाहिलं तर पूर्वा एक डूडल आर्टिस्ट असून तिची स्वतःची डूडल आर्ट कंपनी आहे. ती विविध प्रकारच्या क्रिएटिव्ह डूडल्स तयार करते आणि आपल्या कलेमुळे ओळख निर्माण करत आहे. पडद्यावर सासूबाईंच्या भूमिकेत धमाल करणाऱ्या निर्मिती सावंत यांचे प्रत्यक्ष आयुष्यातील नातेसंबंधही तितकेच खास आणि चर्चेचा विषय ठरत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ