spot_img

Akshaye khanna : ‘धुरंधर’नंतरही अक्षय खन्नाच्या वाट्याला निराशाच ‘दृश्यम 3’नंतर आता ‘रेस 4’मधूनही बाहेर?

spot_img

रेहमान डकैतने प्रेक्षकांची मनं जिंकली, पण आगामी मोठ्या प्रोजेक्ट्सबाबत मात्र संभ्रम कायम

‘धुरंधर’ चित्रपटातून दमदार पुनरागमन करत अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या चित्रपटातील रेहमान डकैत ही त्याची भूमिका, तसेच FA9LA गाण्यावरचा त्याचा हटके डान्स, यामुळे प्रेक्षक अक्षरशः त्याच्या प्रेमात पडले आहेत. खलनायकाची भूमिका असूनही अक्षयने आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडली आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर अक्षय खन्ना सतत ट्रेंडमध्ये आहे. इन्स्टाग्रामवर त्याच्या गाण्यावर आधारित रील्सचा अक्षरशः पाऊस पडलेला दिसतोय. त्यामुळे ‘धुरंधर’नंतर अक्षय पुढे कोणत्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये प्रचंड वाढली आहे.

सुरुवातीला ‘दृश्यम 3’ मध्ये तो झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, ऐनवेळी काही अटी आणि मतभेदांमुळे अक्षयने या चित्रपटातून माघार घेतली. निर्मात्यांनी त्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत टीका केली होती, इतकंच नव्हे तर कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला होता. परिणामी, अक्षय खन्ना ‘दृश्यम 3’चा भाग राहिलेला नाही.

आता अशातच आणखी एक धक्का बसल्याचं बोललं जात आहे. ‘रेस’ फ्रँचाइजीच्या चौथ्या भागातूनही अक्षय बाहेर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काही काळापासून ‘रेस 4’मध्ये सैफ अली खानसोबत अक्षय खन्ना दिसणार, अशी चर्चा होती. मात्र, निर्माते रमेश तौरानी यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

‘एचटी सिटी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं की, “आम्ही अक्षय खन्नाशी संपर्कच साधलेला नाही. कारण आधीच्या भागात त्याच्या पात्राची कथा पूर्ण झाली आहे.” ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षयला पुन्हा फ्रँचाइजीत घेण्याबाबत विचार आहे का, या प्रश्नावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं.

इतकंच नाही तर ‘रेस 4’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा किंवा सैफ अली खान यांच्या भूमिका निश्चित झाल्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला. सध्या चित्रपटाची पटकथा तयार करण्याचं काम सुरू असून कोणत्याही कलाकारांवर अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

एकीकडे ‘धुरंधर’मधील यशामुळे अक्षय खन्ना पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचं दिसत असताना, दुसरीकडे मोठ्या बॉलिवूड फ्रँचाइजींपासून तो दूर राहत असल्याचं चित्र सध्या तरी स्पष्ट होत आहे. आता पुढचा डाव कोणता, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ