spot_img

Amruta Khanvilkar First Salary : साध्या दुकानापासून रुपेरी पडद्यापर्यंतचा संघर्ष अमृता खानविलकरच्या अशी आहे यशाची कहाणी

spot_img

मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील दिग्गज अभिनेत्रीची मेहनत, कष्ट आणि प्रेरणादायी प्रवास

मराठी सिनेमा आणि हिंदी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. रॉयल आणि आलिशान जीवन जगत असलेली अमृता, तरीही सुरुवातीला साध्या जीवनातून मार्गक्रमण करत होती. अभिनयाच्या दुनियेत यश मिळवण्यापूर्वी तिने अनेक साध्या नोकऱ्या केल्या, जसे की चश्म्याच्या दुकानात काम करणे, काऊंटर पुसणे, काचेची साफसफाई करणे.

एका मुलाखतीत अमृता म्हणाली, “सुयोग ऑप्टिक्समध्ये काऊंटवर लेन्स विकायचे. जवळपास दीड महिने काम केले, पगार फक्त 500 रुपये होता. पहिल्या दिवशी 50 रुपये बक्षीस म्हणून मिळाले. काऊंटर पुसणे, काचेची साफसफाई अशी सगळी कामे मी केली आहेत.”

अमृता पुढे सांगते, की दुकानासमोर असलेल्या होर्डिंगकडे पाहत ती नेहमी स्वतःला प्रेरित करत होती, आणि एक दिवस त्या पडद्यावर काम करण्याची इच्छा होती. त्यानंतर तिने मॉडेलिंगची सुरुवात केली, साड्यांच्या कॅटलॉगसाठी फोटोशूट केले, आणि त्या कामासाठी तिला तीन हजार रुपये मिळाले. त्यावेळी शूटिंग २४ तास चालत असे. आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. साध्या दुकानात काम करणारी अमृता आता अनेकांच्या प्रेरणास्थान ठरली आहे.

अमृता हिने मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये अनेक मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नटरंग’, ‘चंद्रमुखी’, ‘राझी’ या चित्रपटांमधील तिच्या दमदार अभिनयामुळे चाहत्यांना मनोरंजन मिळाले. तसेच, अमृता एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे; तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होत असतात.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ