spot_img

Tamannaah Bhatia : गोव्यातील न्यू इअर पार्टीत तमन्ना भाटियाने 6 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी 6 कोटींचे घेतले मानधन

spot_img

‘आज की रात’ (Aaj ki raat) या गाण्यातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री तमन्ना भाटियाचा (Tamanna Bhatia) चाहतावर्ग खूप मोठा आहे. चित्रपटापेक्षा ती सध्या आयटम साँगमुळे (Item Songs) चर्चेत आली आहे. जेलर चित्रपटातील कावाला असो किंवा, द बॅड्स ऑफ बॉलिवूडमधील गाफूर. या गाण्यांमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. दरम्यान, प्रसिद्धीमुळे तिची आयटम साँग साईन करण्यासाठी डिमांडही वाढली. सध्या प्रकाशझोतात असणाऱ्या अभिनेत्रीनं तिचं मानधनसुद्धा वाढवलं आहे. आयटम साँग व्यतिरिक्त अभिनेत्री अनेक कार्यक्रमात डान्स देखील सादर करते. अलिकडेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तमन्नाचा डान्स ठेवण्यात आला होता. या डान्ससाठी तिनं आयोजकांकडून तगडी मानधन आकारली आहे. फक्त 6 मिनिटांच्या डान्ससाठी तिनं ६ कोटी मानधन घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.

गोव्यात न्यू इअर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. बागा बीच येथील लास ओलास बीच क्लबमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात तमन्ना भाटियाने आयटम साँग सादर केला होता. या कार्यक्रमातील तिचा डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तिचा परफॉर्मन्स धमारेदार ठरला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या शोमध्ये तिनं साधारण 6 मिनिटांसाठी स्टेजवर परफॉर्म केला. परंतु, 6 मिनिटांच्या परफॉ़र्मन्ससाठी तिनं तब्बल ६ कोटी आकारले असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी तिनं खास अभिनेत्री सोनम बाजवासोबत स्क्रीन शेअर केली होती.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ