spot_img

Sanjay Raut : ठाण्यात भाजपचा वेगळा डाव? शिंदेंचा पराभव भाजपलाच हवा – संजय राऊतांचा खळबळजनक दावा

spot_img

मोदींच्या बॅनरने ठाण्यात प्रचार सुरू; बॅनरबाजीवरून नवा वाद, भाजपवर राऊतांची घणाघाती टीका

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जागावाटप आणि उमेदवार निवडीच्या चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्या असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीला विशेष महत्त्व असून, ही निवडणूक जिंकण्याचा भाजपचा ठाम निर्धार असल्याचं चित्र दिसत आहे.

मुंबईत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युती होण्याची शक्यता असली तरी ठाण्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील कापूरबावडी जंक्शन आणि तीन हात नाका परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे मोठमोठे बॅनर झळकू लागले आहेत. ‘नमो भारत, नमो ठाणे’ असा मजकूर आणि कमळाचं चिन्ह असलेले हे बॅनर ठाण्यात लक्ष वेधून घेत आहेत.

या प्रचारावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केला आहे. “ठाण्याचं महत्त्व यावेळी वेगळं आहे. भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) पराभव करायचा आहे. त्यादृष्टीनेच भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत,” असं राऊत म्हणाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची गणितं वेगळी होती, मात्र महापालिकेत थेट भाजप आणि शिवसेना-मनसे युतीमध्ये लढत होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मुंबईतील शिवसेना भवनासमोर उत्तर भारतीय संघटनांकडून लावण्यात आलेल्या आक्रमक आशयाच्या बॅनरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुकीआधीच या बॅनरबाजीमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. “हे सगळे भाजपचेच उद्योग आहेत. निंदा-वंदा करून गोंधळ घालणं हा त्यांचा धंदा बनला आहे,” असं म्हणत त्यांनी भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ