भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सध्या मैदानावरील कामगिरीसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अलीकडेच हार्दिक पंड्या आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा मुंबईत एका रोमँटिक डेट नाईटवर एकत्र दिसले. या दोघांना पाहताच पॅपराझींनी गर्दी केली आणि काही क्षणांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
व्हायरल व्हिडीओमध्ये हार्दिक माहिकाचा हात घट्ट धरून तिला गर्दीतून बाहेर काढताना दिसतो. पॅप्स आणि चाहत्यांची गर्दी वाढताच हार्दिकने माहिकाला आधी सुरक्षितपणे गाडीत बसवलं. ती कारमध्ये बसल्यानंतरच हार्दिक तिथून हलला. त्याचा हा प्रोटेक्टिव्ह अंदाज पाहून चाहत्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं असून, “खरा पार्टनर असाच असतो”, “हार्दिकचा हा अंदाज मन जिंकणारा असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. हार्दिक आणि माहिका यांचं नातं सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून, दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. मात्र, या बाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. एकीकडे मैदानावर आक्रमक अंदाज, तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यातील हार्दिक पंड्याचा हा वेगळा पैलू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.




