spot_img

Aishwarya Rai-Abhishek Bahchan : ख्रिसमस व्हेकेशनसाठी एकत्र जाताना दिसले अभिषेक-ऐश्वर्या,नेटकऱ्यांच्या रंगल्या चर्चा

spot_img

जया बच्चन (Jaya Bachchan) या त्यांच्या वागण्यामुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. तर बच्चन खानदानाचा सुपूत्र आणि सून, अभिषेक-ऐश्वर्या, त्यांच्या रिलेशनशिपबद्दल उठणाऱ्या विविध अफवांमुळे बऱ्याच काळापासून चर्चेत होते. मात्र काही दिवसांपूर्वीच अभिषेकने (Abhishek Bachchan) एक मुलाखत देत नाराजी, घटस्फोट या सगळ्या अफवा असल्याचे सांगत चर्चा फेटाळून लावल्या. त्यानंतर लेक आराध्या हिच्या स्कूल फंक्शनला अभिषेक-ऐश्वर्या, एवढंच नव्हे तर बिग बी देखील आले होते. त्यामुळे त्यांच्यात सगळं काही आलबेल असल्याचं बोललं जात होतं.

त्यात आता अभिषेक आणि ऐश्वर्या पुन्हा एकदा एकत्र दिसले असून त्यांच्यासोबत लाडकी मुलगी आराध्याही होती. ते तिघेही ख्रिसमस व्हेकेशनसाठी परदेशात गेले असून नुकतेच एअरपोर्टवर स्पॉट झाले. त्यांचा व्हिडीओ समोर आला असून त्यावर लोकांनी विविध मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी तर त्यांच्या ब्लॅक आऊटफिटवरूनही सवाल केलेत, तर काहींनी जया आँटी (जया बच्चन) कुठे आहेत, असाही सवाल विचारला. अभिषेक-ऐश्वर्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ