तीन आरोपीना केली अटक
विजय गायकवाड / नवी मुंबई
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी पोलीस आयुक्तालय परिसरातील अनैतिक व्यापार, अवैध धंदे यांच्यावर कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने अनैतिक मानवी प्रतिबंधक गुन्हे कक्षने दि.21 डिसेंबर रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास तळोजा MIDC येथील नवनाथ इन लॉजिंग वर छापा टाकला असता त्या ठिकाणी सहा पीडित महिला व एक अल्पवयीन मुलगी वेश्या व्यवसाय करण्यासाठी ठेवलेल्या आढळून आल्या यावेळी लॉज मालक व्यवस्थापक, व सर्व्हिस बॉय यांना अटक करण्यात आली असून आरोपीना दोन दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मा. न्यायालयाने दिले आहेत.
वपोनि पृथ्वीराज घोरपडे यांनी प्रसार माध्यमाना अशी माहिती दिली की, AHTU चे वपोनि पृथ्वीराज घोरपडे यांना 21 डिसेंबर रोजी गुप्तबातमीदारकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, तळोजा एम आय डी सी मधील हॉटेल नवनाथ इन लॉजिंग मधील मॅनेजर हॉटेल मध्ये ठेवलेल्या महिलांना ग्राहकांना दाखवून सदर महिलाकडून वेश्या व्यवसाय करून घेत आहे. त्या माहितीच्या आधारे अ. मा. वा. युनिटने सदर लॉज मध्ये बनावट ग्राहक पाठवला असता त्या बनावट ग्राहकाच्या सांकेतिक इशाऱ्यावरून पोलीस पथकाने पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता लॉजमधील एका खोलीत एक अल्पवयीन व सहा पीडित महिला वेश्या व्यवसाया करीता आणून ठेवलेल्या आढळून आल्या बनावट ग्राहकांकडून मोबदला म्हणून सर्व्हिस बॉय रोशन यादव याने दोन हजार रुपये स्वीकारले अनैतिक मानवी वाहतूक गुन्हे पथकाने यावेळी आरोपी 1) वसंत गणेश शेट्टी, 2) गिरीश विठ्ठल शेट्टी,3) रोशन यादव यांना अटक केली. अधिक चौकशी केली असता यातील एक बांगलादेशी अल्पवयीन मुलगी व दोन बांगलादेशी महिला आढळून आल्या.
वरील तिन्ही आरोपी विरोधात BNS 2023 कायदा कलम 143(3), 143( 3), 3(5) सह अनैतिक व्यापार कायदा कलम 1956 कलम 3,4,5 व pocso कलम 4,8,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करीत आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपीना दि. 22 रोजी दुपारी 4 वाजता अटक करण्यात आली त्यांना बेलापूर येथील कोर्टात हजर केले असता मा.कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. AHTU चे सपोआ धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शना खाली वपोनि पृथ्वीराज घोरपडे, पो. हवा. अनिल मांडोळे, ठाकूर चव्हाण, परासूर, पो. शी. कोलते, पो.हवा. सविता म्हात्रे, मनीषा पावडे व पो. हवा. खाडे यांनी कारवाई सहभाग घेतला.




