spot_img

26/11 Terror Attack : Day 1 as Spy’ ट्रेंडवर आक्षेप आयुष साळुंकेनं आठवण करून दिली खऱ्या हिरोची

spot_img

तुकाराम ओंबळेंचं नाव घेऊन अभिनेत्याचा भावनिक व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

सध्या सोशल मीडियावर ‘Day 1 as spy इन पाकिस्तान’ हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. ‘धुरंधर’ सिनेमाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या ट्रेंडवर अनेक कंटेंट क्रिएटर्स वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पोस्ट करत आहेत. मात्र, या ट्रेंडवर काही जणांनी नाराजी व्यक्त केली असून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरनं उघडपणे संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, अभिनेता आयुष साळुंके याने या ट्रेंडकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत एक भावनिक आणि अर्थपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याला कोणी विचारतं, “नाम क्या है?” यावर तो स्वतःचं नाव न सांगता थेट “तुकाराम ओंबळे” असं उत्तर देतो. पुढे तो म्हणतो, ट्रेंड म्हणून आपण काल्पनिक पात्रं प्रसिद्ध करतोय, त्यात काहीच गैर नाही. पण त्याचवेळी खरे हिरो विसरले जाणं चुकीचं आहे.

आयुष साळुंके आपल्या व्हिडीओत शहीद तुकाराम ओंबळे यांच्या शौर्याची आठवण करून देतो. “तुकाराम ओंबळे हे आमचे खरे हिरो आहेत. त्यांनी अजमल कसाबला जिवंत पकडलं. हातात फक्त काठी असताना, अंगावर गोळ्या झेलूनही त्यांनी कसाबला सोडले नाही,” अशा शब्दांत त्याने ओंबळेंच्या पराक्रमाला सलाम केला.

तो पुढे असंही म्हणतो की, आज अजमल कसाबचं नाव जगभरात ओळखलं जातं, पण तुकाराम ओंबळे यांचं नाव फार कमी लोकांना माहिती आहे. “म्हणूनच हे नाव आम्ही कधीही विसरू देणार नाही,” असं सांगत त्याने “जय हिंद… जय महाराष्ट्र…” म्हणत व्हिडीओचा शेवट केला.

हा व्हिडीओ शेअर करताना आयुष साळुंकेनं कॅप्शनमध्ये “नाम भुलना नही…” असं लिहिलं आहे. सध्या त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्स करत अभिनेत्याच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ