spot_img

Ambernath Nagarparishad Election 2025 : भाजपाचा शिवसेना शिंदे गटावर बोगस मतदार आणल्याचा गंभीर आरोप !

spot_img

अंबरनाथमध्ये 208 बोगस मतदार, भिवंडीतून महिला आणल्या.

राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून राज्यातील अनेक मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अंबरनाथच्या (Ambernath Nagarparishad Election 2025) कोहोजगाव परिसरातुन एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. मतदानासाठी शेकडो महिलांची एका सभागृहात गर्दी जमली असून हे मतदार बोगस (Bogus Voters in Ambernath) असल्याचा राजकीय पक्षांनी आरोप केलाय. या प्रकरणानंतर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले असून इथलं वातावरण आता तापलं आहे.

अंबरनाथच्या कोहोजगाव परिसरात एका सभागृहात मोठ्या प्रमाणात पहाटेच्या सुमारास महिला आणि पुरुष जमले होते. हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले असल्याचा आरोप काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय. दरम्यान काँग्रेस व भाजप कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी इथे गोंधळ घातला, या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवाराने आणल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय. या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या सभागृहातील महिलांना बाहेर काढले. या महिला कुठून आल्या आणि खरंच या बोगस मतदान करण्यासाठी आल्या होत्या का? याची चौकशी आता केली जाते आहे. मात्र या सगळ्या प्रकारामुळे इथलं वातावरण तापलं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ