spot_img

Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Photos Viral :  रश्मिका मंदाना–विजय देवरकोंडा लग्नाच्या व्हायरल फोटोंमागचं सत्य काय?

spot_img

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे लग्नाचे फोटो AI-जनरेटेड; चाहत्यांची मात्र मोठी संभ्रमावस्था

सध्या मनोरंजन विश्वात लग्नाचा हंगाम जोरात सुरू असून अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. काहींचे विवाहसोहळे पार पडले आहेत, तर काहींच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत. अशा वातावरणात आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

काही दिवसांपासून दोघांनी गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चा सुरू असतानाच अचानक रश्मिका आणि विजयच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. कोणतीही पूर्वकल्पना नसताना थेट लग्नाचे फोटो समोर आल्याने चाहत्यांना मोठाच धक्का बसला. अनेकांनी या फोटोंवर कमेंट्स करत दोघांचे अभिनंदनही केले.

व्हायरल फोटोंमध्ये रश्मिका नववधूच्या वेशात दिसतेय. भरजरी साडी, पारंपरिक दागिने आणि चेहऱ्यावर नववधूचा तेजस्वी आनंद झळकत आहे. तर विजय देवरकोंडा शेरवानीमध्ये दिसत असून दोघांच्या गळ्यात वरमाला आहेत. भव्य आणि शाही सेटअप पाहता एखाद्या मोठ्या विवाहसोहळ्याचा भास होत आहे. इतकंच नाही तर महेश बाबू, नम्रता शिरोडकर, प्रभास यांसारखे दाक्षिणात्य सुपरस्टार्सही या फोटोंमध्ये उपस्थित असल्याचं दिसतंय.

मात्र या फोटोंची सत्यता तपासल्यानंतर मोठा खुलासा झाला आहे. रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाचे हे व्हायरल फोटो खरे नसून ते AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) च्या मदतीने तयार करण्यात आलेले आहेत. फोटो इतके वास्तवदर्शी आहेत की, एक नजर टाकताच कुणालाही ते खरे वाटू शकतात. प्रत्यक्षात मात्र रश्मिका आणि विजय यांचा लग्नसोहळा झालेला नाही.

दरम्यान, आणखी एका चर्चेनेही जोर धरला आहे. अलीकडेच रश्मिका तिच्या मैत्रिणींसोबत श्रीलंकेला गेलेली होती. तिथून तिने शेअर केलेल्या फोटोंमुळे ही तिची बॅचलरेट पार्टी असावी, असा अंदाज काही चाहत्यांकडून वर्तवला जात आहे. मात्र याबाबत रश्मिकाने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा फेब्रुवारी 2026 मध्ये लग्न करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितलं जात असलं, तरी आतापर्यंत त्यांनी आपल्या नात्याबद्दल किंवा लग्नाबाबत उघडपणे काहीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारे लग्नाचे फोटो आणि दावे हे केवळ अफवाच असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ