spot_img

Vickey Kaushal on fatherhood : बाबा झाल्यावर विक्की कौशलचा सांगितली खरी अवस्था, “आता अभिनयापेक्षा डायपर बदलण्यात जास्त एक्स्पर्ट”

spot_img

दिल्लीतील कार्यक्रमात विक्कीने शेअर केला पॅरेंटहूडचा अनुभव; शहराबाहेर जाणंही ठरलं भावनिक

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कॅटरीना कैफ (Katrina Kaif) 7 नोव्हेंबर 2025 रोजी एका गोंडस मुलाचे पालक झाले. सध्या हे दोघेही पालकत्वातील प्रत्येक क्षण मनापासून अनुभवत असून, आयुष्याचा हा नवा टप्पा एन्जॉय करत आहेत. मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच विक्की कौशल मुंबईबाहेर दिसला आणि तो एका कार्यक्रमासाठी दिल्लीत पोहोचला.

या कार्यक्रमादरम्यान विक्कीने बाबा झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल आणि मनात झालेल्या बदलांबद्दल प्रामाणिकपणे भाष्य केलं. अभिनय आणि डान्ससाठी ओळखला जाणारा विक्की आता घरात वेगळीच भूमिका निभावत असल्याचं त्याने हसत सांगितलं. “मी अभिनयापेक्षा डायपर बदलण्यात जास्त पटाईत झालो आहे. एवढंच सांगू शकतो,” असं म्हणत त्याने उपस्थितांना हसवलं.

बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच शहराबाहेर जाण्याचा अनुभव सोपा नव्हता, असंही विक्कीने कबूल केलं. तो म्हणाला, “पहिल्यांदा बाबा झाल्यानंतर घर सोडून बाहेर येणं खूप कठीण वाटलं. पण एक दिवस जेव्हा माझा मुलगा हे सगळं पाहील, तेव्हा त्याला आपल्या वडिलांचा नक्कीच अभिमान वाटेल. बाबा असणं म्हणजे नेमकं काय, हे शब्दांत मांडणं खरंच अवघड आहे.”

विक्की आणि कॅटरीनाने 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे खासगी समारंभात लग्न केलं होतं. या डेस्टिनेशन वेडिंगला केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. लग्नापर्यंत दोघांनीही आपलं नातं प्रसारमाध्यमांपासून दूरच ठेवलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर कॅटरीनाने पहिल्या बाळाला जन्म दिला आणि ही आनंदाची बातमी दोघांनीही सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली.

वर्क फ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, विक्की कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटाने जगभरात सुमारे 807 कोटी रुपयांची घवघवीत कमाई केली. लवकरच विक्की संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत झळकणार आहे. तर कॅटरीना कैफ शेवटची ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ