spot_img

Shehnaaz Gill : “सिद्धार्थ गेल्यानंतर मी बदलले; माझी निरागसता हरवली” शहनाज गिलने केला हृदयस्पर्शी खुलासा

spot_img

‘इक कुडी’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान शहनाज गिलने रणवीर अलाबादियाच्या पॉडकास्टमध्ये सिद्धार्थ शुक्लाविषयी भावना व्यक्त केल्या; म्हणाली “तो मला परिपक्व बनवून गेला.”

‘बिग बॉस 13’मधून घराघरात पोहोचलेली शहनाज गिल (Shehnaz Gill) सध्या तिच्या नवीन पंजाबी चित्रपट ‘इक कुडी’ मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणवीर अलाबादियाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी होताना शहनाजने तिच्या आयुष्याशी आणि सिद्धार्थ शुक्लासोबतच्या नात्याशी निगडित अनेक गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्या.

सिद्धार्थच्या आकस्मिक निधनानंतर ती पूर्णपणे बदलली असल्याचं शहनाज म्हणाली. “सिद्धार्थ गेल्यानंतर मी पहिली शहनाज राहिले नाही. मी माझी निरागसता गमावली आहे,” असं सांगताना ती भावूक झाली. 2021 मध्ये सिद्धार्थ शुक्लाचं कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं होतं. त्या घटनेने शहनाजला मोठा मानसिक धक्का बसला होता.

शहनाज म्हणाली, “सिद्धार्थ मला खूप परिपक्व बनवून गेला. जर हे सर्व घडलं नसतं, तर मी अजूनही तीच ‘बिग बॉस’मधली बेफिकीर शहनाज असते. त्याच्यानंतर मी जीवनाकडे खूप वेगळ्या नजरेने पाहायला लागले.”

शहनाज आणि सिद्धार्थ यांची ओळख ‘बिग बॉस 13’मध्ये झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये वाद व्हायचे, पण नंतर ती मैत्री प्रेमात बदलली. चाहत्यांनी त्यांना ‘सिदनाज’ असं टोपणनाव दिलं होतं.

तिने पुढे सांगितलं, “आजही मी आमच्या जुन्या व्हिडीओज पाहते आणि स्वतःकडे पाहून थक्क होते. किती बदलले आहे मी! त्या काळातली शहनाज वेगळी होती – निष्पाप, मनमौजी आणि बेफिकीर. पण आयुष्याने मला खूप काही शिकवलं.”

शहनाजने सांगितलं की, बिग बॉसनंतर ती चंदीगडला परत जाण्याच्या विचारात होती, पण सिद्धार्थने तिला मुंबईत थांबवलं आणि इथेच करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. “त्याने माझ्यासाठी सगळ्या गोष्टींची व्यवस्था केली. आज मी जिथे आहे, त्याचं मोठं श्रेय सिद्धार्थलाच जातं,” असं ती म्हणाली. ही मुलाखत पाहून पुन्हा एकदा चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आलं, कारण ‘सिदनाज’च्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ