spot_img

Girija Oak : ‘निळ्या साडीतली सुंदरी’ ठरली चर्चेचा विषय, सोशल मीडियावर गिरीजा ओकचा लूक होतोय व्हायरल!

spot_img

सोशल मीडियावर ‘ही महिला कोण?’ अशी सुरू झाली चर्चा; अभिनेत्री गिरीजा ओकची साधी पण देखणी स्टाईल चाहत्यांना भुरळ घालत आहे.

अलीकडेच सोशल मीडियावर निळ्या साडीतली एक महिला प्रचंड चर्चेत आली होती. ‘ही कोण आहे?’, ‘ही प्रिया बापट आहे का?’ असे प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारले जात होते. पण ही दुसरी-तिसरी कोणी नसून, मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) आहे हे समजताच चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली.

गिरीजाने नुकत्याच एका मुलाखतीसाठी कॉटनची निळी साडी परिधान केली होती. तिचा हा साधा पण देखणा लूक सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, ती एकाच क्षणात ट्रेंडिंगमध्ये आली. अनेकांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं, काहींनी तर तिला ‘सेक्सी’ अशी उपाधीही दिली. मात्र मराठी चाहत्यांनी अभिमानाने सांगितलं की, “तुम्ही तिला आज पाहिलंत, आम्ही मात्र तिला अनेक वर्षांपासून ओळखतो.”

या संपूर्ण घटनेवर गिरीजाने स्वतःच प्रतिक्रिया देताना सांगितलं, “मला हे सगळं खूप मजेशीर वाटतंय. मी नाटकाच्या तालमीमध्ये होते, आणि फोन सतत वाजत होता. मित्रमैत्रिणींकडून मेसेज येऊ लागले की, एक्सवर (ट्विटर) माझ्याबद्दल चर्चा सुरू आहे. मला हे सर्व पाहून आनंदच झाला.”

ती पुढे म्हणाली, “असे ट्रेंड येतात आणि जातात. पण माझं काम, माझी ओळख मात्र कायम राहणार आहे. जर या निमित्ताने लोकांना माझ्या कामाबद्दल समजत असेल, तर यापेक्षा मोठा आनंद काहीच नाही.”

गिरीजा ओकचा सिनेसृष्टीशी खोल संबंध आहे. तिचे वडील दिग्गज अभिनेते गिरीश ओक (Girish Oak), तर सासरे नामवंत निर्माते आणि पती दिग्दर्शक आहेत. गिरीजाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही ठसा उमटवला आहे. अलीकडेच ती शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ