spot_img

National Election commission : निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांचा मोर्चा ! कोणत्या आहेत त्या प्रमुख चार मागण्या ?

spot_img

निवडणूक आयोग आणि मतदान प्रक्रियेतील गोंधळाविरोधात विरोधकांनी मोर्चा काढला आहे. सत्याच्या मोर्चातून निवडणूक आयोगाला विरोधकानी कात्रीत पकडलं आहे. फॅशन स्ट्रीट पासून ते मुंबई महापालिकेपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असून दुपारी 1 वाजता हा मोर्चा सुरू झाला. या मोर्चासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथून स्लो लोकलने चर्चगेटपर्यंत प्रवास केला होता. ते या मोर्चाच्या दीड तास अगोदरच दाखल झाले होते. मोर्च्याच्या आढावा घेणयासाठी ते तिथे लवकर आले होते. तर उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून येऊन हजेरी लावली. काँग्रेसचे नेते ही या मोर्चात दाखल झालं असून डाव्या पक्षाचे नेतेही या मोर्चाच सहभागी झाले आहेत. पुण्यातून जागरण गोंधळ घालणारे मुंबई महानगरपालिका मुख्य इमारती समोर दाखल झाले होते. संबळ वाजवून जागरण गोंधळाला सुरुवात झाली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या शिवसेना आणि मनसेचे सरकार येऊ द्या यासाठी तुळजाभवानीकडे गोंधळीनी प्रार्थना केली.

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मतदानाच्या वेळी बरेच गैरप्रकार झाले. मतांची फेरफार देखील झाली. मतदार याद्यांमध्ये हेराफेरी करून भाजप सरकार सत्तेवर आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे . त्याचसंदर्भात हा मोर्चा असून गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने याविषयीची चर्चा, बैठका आणि पत्रकार परिषद घेऊन वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी तीन वेळा पत्रकार परिषदमध्ये मतदान चोरीचा आरोप भाजप सरकारावर लावला होता. पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील घोळावर त्यानीं प्रेंझेटशन दिले होते. त्यात त्यांनी देशातील कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील मतदानातील हेराफेरीचा आरोप केला विरोधकानीं प्रमुख मागण्या या मोर्चातून केल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांसह महापालिका निवडणुकांच्या अगोदर मतदार याद्या अचूक माहिती समाविष्ट करा.

मतदार याद्यातील घोळ संपल्याशिवाय, त्या सदोष झाल्याशिवाय पुढील सहा महिन्यापर्यंत कोणतीही निवडणूक घेऊ नका

मतदार याद्यांमधील दुबार नावं अगोदर हटवा

7 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा

या काही मागण्या केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ