Rohit Arya Encounter Case : मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये एकूण 17 लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचे(Rohit Arya) एन्काऊंटर करण्यात आला होता. पोलिसांनी खिडीच्या काचा फोडून आत प्रवेश करून मुलांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी रोहित आर्यावर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला आणि यातच त्याचा मृत्यू देखील झाला . दरम्यान, आता या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रोहित आर्या सरकारकडे त्याचे थकलेले पैसे मागत होता, असा दावा केला जातोय. तर दुसरीकडे राज्याच्या शिक्षण विभागाने सांगितेलेले कि रोहित आर्याशी सरकारने कोणताही करार केला नव्हता. असे असतानाच 17 मुलांना ओलीस ठेवण्यासाठी रोहित आर्याने चांगलाच प्लॅन आखला असल्याची बाब समोर आली. त्याने याच आरए स्टुडिओत ऋचिता जाधव या अभिनेत्रीलाही बोलवलं होतं. अशी माहिती समोर आली होती. खुद्द ऋचितानेच ही माहिती सांगितली आहे.
रोहित आर्य बऱ्याच दिवसापासून हा प्लॅन रचत होता असे एकंदरीत दृश्यावरून आपल्याला समजते. त्याने एक चित्रपट करायचा असून त्यासाठी ऑडिशन ठेवण्यात आल्याचे ढोंग रचले. याच प्लॅनचा भाग म्हणून त्याने अभिनेत्री ऋचिता जाधव हिलाही कॉल केला होता. तू आरए स्डुडिओत ये, मी तुला चित्रपटात काम करण्याची संधी देतो, असे रोहित आर्याने तिला सांगितले होते. घरात निर्माण झालेल्या वैद्यकीय अडचणींमुळे ऋचिता आरए स्टुडिओत जाऊ शकली नाही. ज्यामुळे रोहित आर्याचे हे मुलांना ओलीस ठेवण्याचे कारस्थान समोर आले.
टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत तिने असे, “रोहित आर्या याने मला 4 ऑक्टोबर रोजी एक मेसेज केला होता. मी एक चित्रपट करणार आहे आणि मला त्यासंदर्भात तुमच्याशी चर्चा करायची आहे, अशा आशयाचा इंग्रजीमध्ये मेसेज केला होता. मी त्याला म्हणले आपण याबाबत बोलुयात. संध्याकाळी मी फ्री झाल्यानंतर साडेसात वाजता आमचे संभाषण झाले. साधारण 9 मिनिटे फोनवरून बोललो. कॉलदरम्यान त्याने मला चित्रपटाची कथा सांगितले. त्याने ब्रिफ दिला, एक चांगला माणूस असतो. जो दहशतवादी नसतो. तो विद्यार्थ्यांना डांबून ठेवतो आणि त्याच्या काही मागण्या असतात. सरकारपर्यंत त्याला या मागण्या पोहोचवायच्या असतात. तो अतिशय चांगला माणुष्य असतो, अशी काही चित्रपटाची कथा त्याने मला सांगितली होती,” रोहित आर्याबद्दल तिने केला खुलासा.




