ग्लॅमरसने भरलेल्या दुनियेत काळोखाचा पडदा हा असतो. बॉलीवूडपासून (Bollywood) ते साऊथ सिनेसृष्टीपर्यंत (South Industry)अनेक अभिनेत्री आजही कास्टिंग काऊचसारख्या वाईट अनुभवांचा शिकार बनतात. यापूर्वी बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांबद्दल सांगितलं, किंवा आलेल्या अनुभवाबद्दल भाष्य केले आहेआणि आता प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती (Mithoon Chakravaty)यांच्या सुनेने, अभिनेत्री मदलसा शर्माने (Madalsa Sharma)देखील तिचा याबद्दलचा अनुभव शेअर केला आहे. तिनेही याबद्दल मौन तोडलं आहे.
अभिनेत्री मदलसा शर्माने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत साऊथ इंडस्ट्रीतील अनुभवांबद्दल भाष्य केले. ती म्हणाली, “मी साऊथमध्ये काम करत होते, पण काही वाईट अनुभव आले ज्यामुळे मला खूप तेथे काम करू वाटेना. आलेल्या विचित्र अनुभवामुळे मला जाणवलं की हा मार्ग माझ्यासाठी योग्य नाही, आणि इथून दुसरीकडे जाणेच योग्य आहे ,म्हणून मग मी तिथून मुंबईत परतले.”
मदलसाने पुढे सांगितले, त्या काळात ती फक्त १७ वर्षाची होती. आणि पहिल्याच भेटीत तिला विचित्र अनुभव आला. काही प्रत्यक्ष आलेल्या अनुभवामुळे मी तिथून दूर जाणंच पसंत केलं. मदलसाने कबूल केलं की कास्टिंग काऊचसारखे प्रकार केवळ एका ठिकाणी मर्यादित नसून ते सर्वत्र इंडस्ट्रीमध्ये पसरलेले आहे. पण साऊथमध्ये मला थोडं जास्त निराशाजनक वाटलं.त्या नंतर मदलसाने साऊथ इंडस्ट्रीपासून लांब जात बॉलीवूड आणि टेलिव्हिजनकडे वळण्याचा निर्णय घेतला. आज ती अनेक मालिकांमध्ये झळकते आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने देखील जिंकते.




