IND vs ENG : ‘चूक मानण्यास गिलचा नकार!’; इंग्लंडमधील मालिका पराभवानंतर कर्णधाराचे वादग्रस्त विधान

spot_img

लंडनच्या मैदानावर पार पडलेल्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकांमधील दारूण पराभवानंतर भारतीय संघाच्या निवडीवर आणि रणनीतीवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. संघात तरुण खेळाडूंना संधी देत नवे प्रयोग करण्यात आले, परंतु दोन्ही मालिका हातातून निसटल्याने कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः अंतिम वनडे सामन्यात चार मुख्य वेगवान गोलंदाज आणि एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून अक्षर पटेलला खेळवण्याचा निर्णय पूर्णपणे अंगलट आला. या सामन्यात अक्षरला एकही बळी टिपता आला नाही आणि त्याने १० षटकांत ६१ धावा मोजल्या.

प्रमुख फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संघातून वगळल्याबाबत स्पष्टीकरण देताना कर्णधार गिलने सांगितले की, मागील सामन्यांमधील खेळपट्ट्या फिरकीपटूंना अनुकूल नव्हत्या. त्यामुळे फिरकीपटू गोलंदाजीला आल्यावर बचावात्मक खेळ करावा लागत होता, तर वेगवान गोलंदाजांकडून विकेट मिळण्याची शक्यता जास्त वाटत होती. मात्र, भारताने दिलेल्या ३८७ धावांच्या डोंगरासारख्या आव्हानाचा बचाव करताना इंग्लंडच्या फिरकीपटूंनी उत्तम कामगिरी केली. आदिल रशीद, विल जॅक्स आणि अर्धवेळ फिरकीपटू जेकब बेथेल यांनी सुरेख गोलंदाजी केली. बेथेलने १३८ धावांवर खेळणाऱ्या शतकवीर रोहित शर्माची महत्त्वपूर्ण विकेट घेत भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या.

खेळपट्टीच्या बदलत्या मिजासावर बोलताना गिलने मान्य केले की, सामना जसजसा पुढे सरकला तसतशी खेळपट्टी अपेक्षेपेक्षा जास्त संथ झाली. दरम्यान, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यकाळात फलंदाजीची खोली वाढवण्यासाठी केवळ अष्टपैलू खेळाडूंनाच प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. कुलदीप यादवकडे अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदरसारखी फलंदाजीची क्षमता नसल्याने त्याला वारंवार संघातून बाहेर बसावे लागत आहे. त्यामुळे केवळ आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान टिकवून ठेवणे कुलदीपसाठी कठीण झाले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ