Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut : मला झोपडपट्टीत ठेवलं, अघोरी पूजेला विनायक राऊत स्वतः हजर होते!’; सूनेचे पत्रकार परिषदेत खळबळजनक खुलासे, अटक करण्याची मागणी!

spot_img

“विनायक राऊत वर्षातून फक्त दोनदाच यायचे”; मानसिक छळ आणि दोन कोटींच्या निवडणुकीच्या धमकीवरून गिरीजा राऊत यांचा सासरच्यांवर थेट हल्ला.

ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कौटुंबिक वादाने आता अधिक उग्र रूप धारण केले आहे. सासरच्या ७ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर, विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी आता थेट जाहीर पत्रकार परिषद घेऊन अनेक खळबळजनक दावे केले आहेत. या प्रकरणात विनायक राऊतांसह सर्व आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावी, अशी मागणी गिरीजा आणि त्यांच्या वकिलांनी केली आहे. विनायक राऊत यांनी यापूर्वी हे सर्व आरोप फेटाळून लावत सूनेने ५ कोटींची खंडणी मागितल्याचे म्हटले होते, त्याला उत्तर देताना गिरीजा यांनी राऊत कुटुंबाच्या अंतर्गत बाबी चव्हाट्यावर आणल्या आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना गिरीजा राऊत म्हणाल्या की, “गेल्या सात वर्षांपासून माझा प्रचंड मानसिक छळ (मेंटल ट्रॉमा) केला जात होता. माझा नवरा मला मारहाण करायचा. माझ्या वडिलांनी दोन कोटी रुपये खर्च करून निवडणूक लढवली होती, त्यामुळे ‘तुझ्या तक्रारीमुळे वडिलांची इमेज खराब होईल’ अशी धमकी मला नवरा सातत्याने द्यायचा.” राऊत कुटुंबाच्या राहणीमानावर आणि विनायक राऊत यांच्यावर आरोप करताना त्या म्हणाल्या, “विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नी आणि मुलीसोबत दुसऱ्या आलिशान घरात राहतात, तर आम्हाला त्यांनी झोपडपट्टीत ठेवले होते. लग्नाआधी त्यांचे दुसरे घर झोपडपट्टीत आहे, हे आम्हाला कधीही सांगितले गेले नव्हते.”

विनायक राऊत हे कुटुंबप्रमुख म्हणून कधीच समोर आले नाहीत, असा दावा करत गिरीजा यांनी सांगितले की, “ते वर्षातून केवळ दोनच दिवस घरी यायचे—एकदा नवरात्रीत घट बसतात तेव्हा आणि दुसऱ्यांदा घट उठतात तेव्हा! इतर वेळी ते कधीच घरी आले नाहीत, फक्त फोनवरून जबाबदारी घेण्यास सांगायचे. त्यांनी मुलगा आणि सुनेला समोर बसवून कधीच समजावले नाही.” सर्वात गंभीर आरोप करताना गिरीजा यांनी स्पष्ट केले की, सिंधुदुर्गात झालेल्या एका अघोरी पूजेच्या वेळी विनायक राऊत स्वतः हजर होते आणि त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही तिथे गेलो होतो. दरम्यान, विनायक राऊत यांनी यापूर्वीच हे सर्व दावे निव्वळ पैशांसाठी केले जात असल्याचे सांगत फेटाळले असल्याने, आता या हाय-प्रोफाइल प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ