spot_img

Sanjay Raut : महायुतीकडे खरंच कोणते नेते आहेत का? संजय राऊतांचा महायुतीला सवाल

spot_img

मतचोरी, घोटाळ्यांचा आरोप करत राऊतांनी साधला निशाणा

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवणारी घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी महायुतीच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतचोरी आणि घोटाळ्यांच्या माध्यमातून सत्ता मिळवल्याचा गंभीर आरोप केला. यासोबतच शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र येऊन बळकटीकरण करत असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले. यामुळे महाविकास आघाडीत (एमव्हीए) मनसेचा समावेश होण्याचे संकेत मिळत असले, तरी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.दुसरीकडे, ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीच्या ताकदीचा गौरव करताना केंद्रातील नेत्यांना टोला लगावला. “देशावर संकट आलं की मोठमोठे नेते माझं नाव घेतात. हीच बारामतीची ताकद आहे. देशाला संदेश जायला हवा की, काम द्यायचं असेल तर बारामतीच्या तरुणांना द्या,” असं विधान त्यांनी नुकतंच केलं. याचवेळी सोलापूरमध्ये ऑपरेशन लोटसच्या चर्चांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या चार माजी आमदारांचा भाजपात प्रवेश होण्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण तापलं आहे. या दोन्ही घटनांचा आधार घेत राऊतांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. “ऐसा कोई सगा नही, जिसे भाजपने ठगा नही,” असा खोचक टोला त्यांनी लगावला. अजित पवारांना “भाजपसमोर किस खेत की मुली” असल्याची उपमा देत त्यांनी टीकेची धार तीव्र केली.

राऊतांच्या या टीकेला आता भाजपकडून काय प्रत्युत्तर मिळतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.राऊतांनी पवारांच्या विधानाचा दाखला देत म्हटलं की, संकटकाळात सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावतो. “शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना वेळोवेळी मदत केली. पण त्यांनी या मदतीची परतफेड कशी केली, हे सर्वांनी पाहिलं आहे. पवारांचा कृषी आणि संरक्षणमंत्री म्हणूनचा अनुभव, तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांचे संबंध आजही केंद्राला उपयोगी पडतात. पण राजकारणात चिखलफेक करणारे याचा विसर पडतात,” असा टोमणा राऊतांनी मारला. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना आता विचार आणि संघटनेच्या जोरावर पुढे जाणार असल्याचा दावा राऊतांनी केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेच्या उपशाखाप्रमुखांचा मेळावा 27 ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे. “महायुतीकडे खरंच कोणते नेते आहेत का?” असा खरमरीत सवाल करत राऊतांनी पुन्हा मतचोरी आणि पैशाच्या जोरावर विजय मिळवल्याचा आरोप केला. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात आणखी रंगत येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ