Mixer Grinder : वर्षानुवर्षे मिक्सर राहील नव्यासारखा; जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

spot_img

आजच्या धावपळीच्या जीवनात किचनमधील काम सोपं आणि जलद करण्यासाठी मिक्सर ग्राइंडर प्रत्येक घरातील अत्यावश्यक उपकरण बनलं आहे. मसाले वाटणे, चटण्या तयार करणे, ज्यूस बनवणे किंवा विविध खाद्यपदार्थांची तयारी करण्यासाठी मिक्सरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, अनेकदा घाईत किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे मिक्सर लवकर खराब होण्याची शक्यता वाढते. काही साध्या गोष्टींची काळजी घेतल्यास मिक्सरचे आयुष्य मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

मिक्सर जारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पदार्थ भरल्यास मोटारवर अतिरिक्त ताण येतो आणि ती गरम होऊन जळण्याचा धोका निर्माण होतो. तसेच गरम सूप, उकडलेले पदार्थ किंवा अतितापमान असलेले साहित्य थेट मिक्सरमध्ये टाकू नये. गरम वाफेमुळे जारमध्ये दाब तयार होऊन झाकण उडण्याची शक्यता असते. त्यामुळे पदार्थ थोडे कोमट झाल्यानंतरच वाटावेत.

मिक्सर सतत दीर्घकाळ चालू ठेवणेही टाळावे. काही मिनिटे वापरल्यानंतर थोडा वेळ विश्रांती दिल्यास मोटार सुरक्षित राहते. खडे मसाले किंवा कठीण पदार्थ थेट वाटल्यास ब्लेडची धार कमी होऊ शकते. त्यामुळे वेळोवेळी ब्लेड तपासून आवश्यक असल्यास बदलणे महत्त्वाचे ठरते.

मिक्सरचा मुख्य भाग कधीही पाण्यात धुवू नये. तो फक्त ओल्या कापडाने स्वच्छ पुसावा. जारमध्ये दुर्गंधी येत असल्यास कोमट पाणी, लिंबाचा रस किंवा बेकिंग सोडा वापरल्यास वास दूर होण्यास मदत होते. वापरानंतर जार आणि ब्लेड स्वच्छ धुऊन कोरडे ठेवणेही आवश्यक आहे.

याशिवाय, मिक्सर वापरताना हात कोरडे असणे, वायर तुटलेली नाही ना याची खात्री करणे आणि वापरानंतर मेन प्लग बंद करणे या सवयी सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ