मनोरंजन विश्वातील अनेक सितार्यांकडून सध्या गुडन्यूज समोर येत आहेत. कोणाचा साखरपुडा तर कोणाचं लग्न होतंय. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचा नुकताच साखरपुडा झाला. आता यातच आणखी एक आनंदाची बातमी आली आहे ती म्हणजे प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अर्चना कविने (Archana Kavi) हिने दुसऱ्यांदा लग्न केले आहे. घटस्फोटानंतर बराच काळ सिंगल राहिलेल्या अर्चनाने रिक वर्गीस (Rick Varghese) याच्यासोबत लग्न केले. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.
एंकर धन्या वर्मा हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अर्चना आणि रिकच्या लग्नातील काही सुंदर क्षण शेअर केले आहेत व तिने एका फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “माझ्या प्रिय मैत्रिणीचं लग्न झालं!” शेअर केलेल्या व्हिडीओत अर्चना आणि रिक अत्यंत आनंदी आणि उत्साही दिसत आहेत.अर्चना कविच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर सर्वजण नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देखील देत आहेत. अर्चनाने याआधी 2016 साली कॉमेडियन अबीश मॅथ्यू (Abish Mathew) याच्याशी लग्न केलं होतं. पण काही वर्षांतच त्यांच्या नात्यात मतभेद झाले आणि 2021 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.
नंतर अर्चनाने 2009 साली आलेल्या ‘नीलाथमारा’ या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील ‘कुंजिमालू’ या भूमिकेमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात विशेष घर केले . त्यानंतर ‘मी अँड मी’, ‘सॉल्ट अँड पेपर’, ‘हनी बी’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. त्याबरोबरच यावर्षीच तिने टोविनो थॉमस अभिनीत ‘आयडेंटिटी’ चित्रपटातून पुन्हा पडद्यावर पुनरागमन केलं. अर्चना अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर सक्रिय असून, आपल्या व्लॉग्समधून ती चाहत्यांशी संवाद साधत असते.




