Yuvraj Singh : तुम्हाला आता चपलेने बडवण्याची वेळ आलीये’; पंजाबच्या ३ खेळाडूंवर युवराज सिंग का भडकला?

spot_img

प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या पंजाब किंग्जच्या खेळाडूंना युवीने सोशल मीडियावर दिला मजेशीर दम!

आयपीएल 2026 चे प्लेऑफचे संघ निश्चित झाले असतानाच, भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. पंजाब किंग्ज (PBKS) संघातील तीन खेळाडूंना चपलेने मारण्याची उघड धमकी युवराजने सोशल मीडियावर दिली असून, यामुळे क्रिकेट वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

पंजाब किंग्जचे तीन खेळाडू प्रियांश आर्य, अर्शदीप सिंग आणि हरप्रीत ब्रार यांचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. असे असताना हरप्रीत ब्रारने सोशल मीडियावर या तिघांचा एक फोटो शेअर केला. यात त्याने प्रियांशला ‘स्लॉगर’ आणि अर्शदीपला ‘ब्लॉगर’ अशी मजेशीर नावे दिली होती. याच फोटोवर कमेंट करताना युवराज सिंगचा पंजाबी अंदाज पाहायला मिळाला. त्याने कमेंट करत लिहिले, “आता तुम्हा सर्वांना चपलांनी मारण्याची वेळ आली आहे.” युवराजने हे विधान पूर्णपणे थट्टा-मस्करीत आणि जिव्हाळ्यापोटी केले असले, तरी त्याची ही कमेंट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

पंजाब किंग्जचा संघ जरी प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नसला, तरी या खेळाडूंची कामगिरी सरासरी राहिली. प्रियांश आर्याने १३ सामन्यांत २११ च्या धडाकेबाज स्ट्राइक रेटने ३६४ धावा केल्या. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने १४ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या, मात्र त्यासाठी त्याने ५४१ धावा मोजल्या. तर हरप्रीत ब्रारला केवळ दोन सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने २ बळी घेतले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ