Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेलच्या टंचाईमुळे खाद्यतेल महागले, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक आदेश

spot_img

स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील जलवाहतूक विस्कळीत झाल्याने देशात ऊर्जा संकट; साठेबाजी रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना डिझेल पुरवण्यासाठी प्रशासन सतर्क

आंतरराष्ट्रीय स्तरावर इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा आणि ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’मधील विस्कळीत जलवाहतुकीचा थेट परिणाम आता महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. राज्याच्या अनेक भागांत पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून, पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागात शेतीच्या कामांसाठी आवश्यक असणाऱ्या डिझेलचे संकट अधिक गहिरे झाले आहे. इराणने समृद्ध युरेनियम अमेरिकेकडे सोपवण्याची अट फेटाळल्यामुळे युद्धाचे ढग गडद झाले असून, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. या इंधन टंचाईमुळे वाहतूक खर्च वाढल्याने जळगाव जिल्ह्यात खाद्यतेलाच्या किमतीत प्रतिलिटर ३ ते ५ रुपयांची वाढ झाली आहे. तेल वाहतूक करणारे १५ ते २० टँकर गेल्या चार-पाच दिवसांपासून कंपन्यांमध्येच उभे असल्याने बाजारात खाद्यतेलाची टंचाई निर्माण झाली आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला अफवांवर विश्वास ठेवून इंधनाचा अनावश्यक साठा न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने साठेबाजी रोखण्याचे कडक निर्देश दिले आहेत. शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याविना डिझेल उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. “काही ठिकाणी निश्चितच तणावाची स्थिती आहे, परंतु सर्वदूर अशी परिस्थिती नाही. केवळ एकाद-दुसऱ्या घटनेला हायलाईट केले जात आहे,” असे सांगत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ