Nana Patekar On Nitin Gadkari : “गडकरी साहेब, माझी जात माहितीये का?”; नाना पाटेकरांचा भरमंचावरून राजकारण्यांना आणि समाजाला रोकडा सवाल

spot_img

नागपुरातील जलक्रांती परिषदेत नाना पाटेकरांचे जातीयवादावर परखड भाष्य; ‘माणुसकी’ हाच खरा धर्म असल्याची दिली शिकवण

नागपूर येथील एका जाहीर कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वाढत्या जातीयवादावर आणि धर्मकारणावर बोट ठेवत समाजाला अंतर्मुख व्हायला लावणारे विचार मांडले. व्यासपीठावर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना थेट उद्देशून, “गडकरी साहेब, तुम्हाला माझी जात माहिती आहे का?” असा रोखठोक सवाल त्यांनी केला. आपण आजवर कधीही कोणाला स्वतःची जात सांगितली नाही आणि तशी गरजही आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. लहानपणी आईने दिलेली शिकवण आठवत त्यांनी स्पष्ट केले की, ‘माणूस’ हीच आपली एकमेव जात असून ‘माणुसकी’ हाच खरा धर्म आहे. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात केवळ प्रार्थना करण्याच्या पद्धतीचा फरक आहे, बाकी सर्व एकच असल्याचे सांगत त्यांनी समाजातील वाढत्या विषमतेवर चिंता व्यक्त केली.

रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित ‘जलक्रांती’ परिषदेत नाना पाटेकर बोलत होते. यावेळी त्यांनी आजच्या काळात कर्तृत्वाऐवजी माणसाची ओळख त्याच्या जातीवरून ठरत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. समाजात शिक्षणाचा प्रसार वाढल्याशिवाय ही जातीय व्यवस्था मुळापासून संपणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याच कार्यक्रमात त्यांनी नितीन गडकरी यांचे कौतुक करताना त्यांना ‘राजकारणातील अजातशत्रू’ अशी उपमा दिली. या परिषदेला अभिनेते आमिर खान आणि मकरंद अनासपुरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ