Terrorist Attack in Pakistan : बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा रक्तरंजित हल्ला; 9 पोलीस ठार, 15 अतिरेकी ठार केल्याचा पाकिस्तानी सैन्याचा दावा

spot_img

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांत पुन्हा एकदा भीषण दहशतवादी हल्ल्याने हादरला आहे. जियारत जिल्ह्यातील एका पोलीस चौकीवर सोमवारी उशिरा रात्री सशस्त्र दहशतवाद्यांनी अचानक हल्ला चढवत मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. या हल्ल्यात किमान नऊ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पाच सुरक्षा जवानांचे अपहरण केल्याचाही दावा स्थानिक प्रशासनाने केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पोलीस चौकीला लक्ष्य करत स्वयंचलित शस्त्रांनी अंधाधुंद गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा दलांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आणि दोन्ही बाजूंमध्ये अनेक तास चकमक सुरू होती. या संघर्षात मांगी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, कोवास पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि दहशतवादविरोधी पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह अनेक पोलीस जवानांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने केलेल्या प्रतिउत्तरात १५ दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. बलुचिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने क्लिअरन्स ऑपरेशन सुरू करण्यात आले आणि संपूर्ण रात्र कारवाई सुरू होती. प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेनंतर बलुचिस्तानमध्ये सुरक्षा आणखी कडक करण्यात आली असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू आहे. पाकिस्तानमध्ये वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ