Jackfruit Bhaji : ‘या’ पद्धतीने बनवा फणसाच्या आठळ्यांची झणझणीत पारंपरिक भाजी !

spot_img

फणस खायला जितका स्वादिष्ट असतो, तितक्याच त्याच्या बियाही म्हणजेच आठळ्या आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. अनेक घरांमध्ये फणस खाल्ल्यानंतर त्याच्या बिया टाकून दिल्या जातात, मात्र याच आठळ्यांपासून अतिशय चवदार आणि पौष्टिक भाजी तयार करता येते. खास करून पावसाळ्यात किंवा गावाकडच्या पारंपरिक जेवणात ही भाजी आवर्जून बनवली जाते. कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही रेसिपी चवीसोबत आरोग्याचाही उत्तम मेळ घालते.

ही भाजी तयार करण्यासाठी सर्वप्रथम फणसाच्या बिया स्वच्छ धुवून घ्याव्यात. त्यानंतर कुकरमध्ये थोडे मीठ आणि पाणी घालून चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत बिया मऊ शिजवून घ्याव्यात. बिया थंड झाल्यावर त्यांची बाहेरील टरफले काढून आतील भागाचे छोटे तुकडे करावेत. यामुळे भाजी अधिक चवदार लागते.

यानंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालून छान फोडणी द्यावी. फोडणीचा सुगंध दरवळू लागल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परतावा. मग त्यात हळद आणि लाल तिखट घालून मसाला मस्त परतून घ्यावा. आता शिजवलेल्या आठळ्यांचे तुकडे कढईत टाकून मसाल्यात व्यवस्थित मिक्स करावे.

भाजीला थोडे पाणी शिंपडून काही मिनिटे वाफ आणल्यास मसाल्याची चव बियांमध्ये छान मुरते. शेवटी वरून ताजे ओले खोबरे भुरभुरवल्यानंतर या भाजीत एक वेगळीच चव येते. गरम भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत ही भाजी खाण्याची मजाच काही और असते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ