फैजान अन्सारीने तान्या मित्तलवर केले गंभीर आरोप
इन्फ्ल्यूएन्सर तान्या मित्तल (Tanya Mittal) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी तिचे चर्चेत येण्याचे कारण वेगळे आहे. तान्या मित्तल हिच्या विरोधात ग्वाल्हैरचा आणखी एक इंफ्लुएंसर फैझान अन्सारी याने एसएसपी ऑफिसात तक्रार दाखल केली आहे. त्याने तान्या खोटे बोलून लोकांची दिशाभूल करीत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.आपल्या लेखी तक्रारीत अन्सारी याने मागणी केली आहे की तान्या मित्तल हीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात यावी आणि पोलिसांनी तिला लागलीच अटक करावी. फैजान अन्सारीन ग्वाल्हेरमध्ये येऊन तान्या मित्तलवर अनेक आरोप केले.‘बिग बॉस 19’ मध्ये तान्याने तिच्या कुटुंबाबद्दल आणि खाजगी जीवनाबद्दल अनेक खोट्या कंड्या पिकवल्या आहेत. तिच्या दुकानाला तिने फॅक्टरी संबोधत आपले 4-5 बिझनेस असल्याचे खोटेच सांगितले आहे असे अन्सारी यांनी म्हटले आहे.तान्याने बिग बॉसच्या घरात आपल्या श्रीमंतीचे खोटे दिखावे केले आणि थापा मारल्या. परंतू जेव्हा तिचे खरे सत्य बाहेर आले तेव्हा संपूर्ण देशासमोर ती हास्यास्पद ठरली आहे. फैझान अन्सारी याने तान्याच्या विरोधात आपण कोर्टात जाणार आहोत असे म्हटले आहे.
फैजान अन्सारी (Faizan Ansari) यांनी यापूर्वी पूनम पांडे,राखी सावंत,उर्फी जावेद आणि बिग बॉस विजेती एल्विश यादव यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. तान्याशी संबंधित प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, आणखी एका प्रभावशाली व्यक्तीने ग्वाल्हेर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये आरोप करण्यात आला होता की त्यांनी तान्याच्या संपत्ती आणि सुरक्षा रक्षकांच्या दाव्यांचा पर्दाफाश केल्यानंतर, तिच्या भावाने त्याला त्याच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांनी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज देखील दिले होते.




