spot_img

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ, सिम्बॉयसिसच्या दीक्षांत समारंभात पाहायला मिळाला सापाचा थरार

spot_img

किवळे येथील कार्यक्रमात VVIP मंचाखाली साप, पालकांचा रोष आणि प्रोटोकॉल वाद

पिंपरी-चिंचवडजवळील (Pimpari Chinchwad) किवळे येथील सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये आज सहावा दीक्षांत समारंभ आणि स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची उपस्थिती लाभणार आहे. मात्र, या मोठ्या सोहळ्यापूर्वी काही अनपेक्षित घटनांनी सर्वांचे लक्ष वेधले.सोहळ्याच्या मुख्य मंचाखाली एक विषारी साप आढळल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली. VVIP उपस्थित राहणार असलेल्या मंचावर सापाचा शिरकाव झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली, तरी या घटनेने सर्वांना धक्का बसला.

दुसरीकडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांच्या आगमनावेळी प्रोटोकॉलवरून वाद उद्भवला. विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांचे गेटवर स्वागत न झाल्याने मिसाळ यांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाने राज्यमंत्रीपदाच्या प्रोटोकॉलचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी केला, ज्यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली.याशिवाय, दीक्षांत समारंभासाठी आलेल्या पालकांनी ऑडिटोरियमबाहेर गोंधळ घातला. त्यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आल्याने आणि प्रशासनाकडून पुरेशी माहिती न मिळाल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे कार्यक्रमापूर्वीचा माहोल आणखी तणावपूर्ण झाला.या गोंधळानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षांत समारंभात उपस्थितांना प्रेरणादायी संबोधन केले. ते म्हणाले, “सिम्बॉयसिसने कौशल्य विकासात मोठी झेप घेतली आहे, पण आनंदी राहण्याचे आणि जगण्याचे कौशल्यही तितकेच महत्त्वाचे आहे.

स्वतःसाठी टाळ्या वाजवा, पण समाजाचे देणेही विसरू नका.” त्यांनी विद्यार्थ्यांना प्रगतीसोबतच सामाजिक योगदान देण्याचा सल्ला दिला. तसेच, राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत भारताला महाशक्ती बनवण्यासाठी कौशल्य विकासावर भर देण्याचे आवाहन केले.या सोहळ्यातील गोंधळ आणि थरार यामुळे हा दीक्षांत समारंभ चर्चेचा विषय ठरला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ