ST Bus Brand Ambassador : एसटीला नवा ग्लॅमर टच; रितेश-जेनेलिया देशमुख बनणार ब्रॅण्ड ॲम्बेसिटर

spot_img

महाराष्ट्राच्या जनजीवनाशी घट्ट नातं असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या ‘लालपरी’ला आता नव्या रूपात सादर करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. यासाठी लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची एसटी महामंडळाच्या ब्रॅण्ड ॲम्बेसिटरपदी निवड करण्यात आली आहे. या निर्णयामागे एसटीची प्रतिमा अधिक आधुनिक, आकर्षक आणि सर्वसामान्यांना जवळची बनवण्याचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.

सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यासाठी आणि विशेषतः तरुण पिढीला एसटीकडे वळवण्यासाठी ही नवी रणनीती आखण्यात आली आहे. ग्रामीण भागासोबतच शहरी प्रवाशांपर्यंतही एसटी सेवा प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी प्रसिद्ध चेहऱ्यांची मदत घेतली जात आहे. रितेश आणि जेनेलिया यांची लोकप्रियता आणि त्यांचा सकारात्मक प्रतिमेचा फायदा एसटीला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लवकरच या दोन्ही कलाकारांसोबत अधिकृत करार करणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील दोन दिवसांत हा करार पूर्ण होण्याची शक्यता असून, तो पाच वर्षांसाठी असणार आहे. या कालावधीत दोघेही एसटीच्या जाहिराती, प्रचार मोहिमा तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेताना दिसतील.

या उपक्रमामुळे एसटीच्या सेवेकडे लोकांचा विश्वास अधिक दृढ होईल आणि नव्या प्रवाशांना आकर्षित करण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. पारंपरिक ओळख जपत आधुनिकतेकडे वाटचाल करण्याचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ