Arvind Sawant : उद्धव ठाकरे–अरविंद सावंत यांच्यात महत्त्वाची बैठक

spot_img

शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत घडामोडींना पुन्हा एकदा गती मिळाली असून ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार अरविंद सावंत यांना ‘मातोश्री’वर बोलावण्यात आले असून त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये सध्या महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

माहितीनुसार, अलीकडे काही वृत्तपत्रांमध्ये सावंत यांच्यासह काही खासदारांची नावे प्रसिद्ध झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर या बैठकीत चर्चा होत आहे. तसेच संबंधित माध्यमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबतही विचारविनिमय सुरू आहे. सावंत यांनी यापूर्वीच अशा वृत्तांविरोधात कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा दिला होता.

दरम्यान, “मी आयुष्यभर ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच राहणार,” असे स्पष्ट लिखित विधान सावंत यांनी दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या निष्ठेबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

‘ऑपरेशन टायगर’नंतर शिवसेनेत राजकीय हालचाली वाढल्या असून, एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ठाकरे गटातील खासदारांविषयी सातत्याने दावे केले जात आहेत. अशा परिस्थितीत ठाकरे आणि सावंत यांच्यातील ही बैठक पुढील राजकीय घडामोडींसाठी निर्णायक ठरू शकते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ