Pickle Storage Tips : उन्हाळ्यात बनवलेलं लोणचं वर्षभर टिकवायचंय? जाणून घ्या सोप्या टिप्स

spot_img

उन्हाळा सुरू झाला की घराघरात पापड, कुरडया आणि लोणचं बनवण्याची लगबग सुरू होते. रोजच्या जेवणात चव वाढवण्यासाठी लोणच्याला विशेष स्थान असतं. विशेषतः आंब्याच्या हंगामात वर्षभर पुरेल इतकं लोणचं तयार केलं जातं. मात्र योग्य पद्धतीने साठवण न केल्यास हे लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

लोणच्यासाठी वापरणारी फळं नेहमी ताजी आणि स्वच्छ असावीत. ती नीट धुवून पूर्णपणे कोरडी करूनच वापरावी. लोणचं बनवताना बरणीत पाण्याचा अंशही राहणार नाही, याची काळजी घ्यावी. बरणी धुतल्यानंतर ती उन्हात किंवा फॅनखाली व्यवस्थित वाळवावी.

साठवणीसाठी काचेची किंवा मातीची बरणीच योग्य ठरते, कारण प्लास्टिकमध्ये लोणचं पटकन खराब होऊ शकतं. लोणच्यावर तेलाचा जाड थर ठेवणं आवश्यक असतं, ज्यामुळे बुरशी येत नाही. तसेच मीठ हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह असल्याने त्याचं प्रमाण योग्य ठेवणं गरजेचं आहे.

लोणच्याच्या फोडी कापताना स्टीलची सुरी वापरावी आणि तयार लोणचं पूर्ण थंड झाल्यावरच बरणीत भरावं. वापरताना नेहमी स्वच्छ, कोरडा आणि लाकडी किंवा स्टीलचा चमचा वापरावा.

दररोज वापरासाठी थोडं लोणचं वेगळ्या छोट्या बरणीत काढून ठेवल्यास मुख्य साठवण सुरक्षित राहते. बरणी ओलसर किंवा अंधाऱ्या ठिकाणी ठेवू नये. जर लोणच्यावर बुरशी दिसली तर वरचा भाग काढून टाकावा, लोणचं उन्हात ठेवावं आणि त्यात थोडं गरम तेल घालून ते पुन्हा सुरक्षित करता येतं. या सोप्या उपायांनी तुमचं लोणचं वर्षभर ताजं, सुरक्षित आणि चविष्ट राहू शकतं.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ