Gaurav More : ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरेचं स्वप्न पूर्ण; अभिनेत्री छाया कदमने दिल्या शुभेच्छा

spot_img

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून लोकप्रिय झालेला गौरव मोरे आज महाराष्ट्रातील घराघरात ओळखला जातो. “फिल्टरपाड्याचा बच्चन” ही त्याची ओळख चाहत्यांच्या मनात घर करून बसली आहे. आता त्याने मुंबईत स्वतःचे आलिशान घर घेत आपले मोठे स्वप्न पूर्ण केले आहे.

गौरवच्या नव्या घराबाहेर लावलेली “फिल्टरपाड्याचा बच्चन” ही नेमप्लेट विशेष चर्चेत आहे. ज्यामुळे त्याला लोकप्रियता मिळाली, तेच नाव त्याने आपल्या घराला दिले आहे, यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

यासोबतच गौरव मोरेकडून आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्याने गुपचूप लग्न उरकले असून त्याच्या या नव्या आयुष्याची सुरुवातही शांतपणे झाली आहे. अनेक कलाकारांनी त्याच्या घरी भेट देत शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, प्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम यांनीही त्याच्या नव्या घरी भेट देत सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. त्यांनी गौरवच्या प्रवासाचे भावनिक शब्दांत कौतुक केले.

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचा संदर्भ देत गौरवच्या संघर्षमय प्रवासाचे सुंदर वर्णन केले. झोपडपट्टीतून सुरू झालेला प्रवास, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलेला गौरव आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ