Share Market Crash : दोन देशांच्या वादात शेअर बाजाराची ‘होळी’; ट्रम्प यांच्या एका धमकीने गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी स्वाहा!

spot_img

आखाती युद्धाचे सावट आणि इंधनाच्या भडकलेल्या दरामुळे दलाल स्ट्रीटवर भीतीचे वातावरण; सेन्सेक्स-निफ्टी १ टक्क्याने आपटले

जागतिक राजकारणातील वाढता तणाव आणि आखाती देशांमधील युद्धाची चिन्हे यामुळे भारतीय शेअर बाजारात मंगळवारी रक्ताळलेली स्थिती पाहायला मिळाली. सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला असून, बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी १ टक्क्याने खाली आले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कडक इशाऱ्यामुळे बाजारात भीतीचे सावट पसरले असून, काही क्षणांतच गुंतवणूकदारांच्या मालमत्तेतून तब्बल ४.२४ लाख कोटी रुपये पुसले गेले.

बाजारातील प्रमुख घडामोडी:

सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स ७३,३२६.६१ अंकांवर आला, तर निफ्टी २२,७७१.७५ अंकांपर्यंत घसरला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही १ टक्क्याची पडझड झाली. इंडिगो, झोमॅटो (Eternal), महिंद्रा अँड महिंद्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि ॲक्सिस बँक यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स २ ते ३ टक्क्यांनी घसरले. निफ्टी ऑटो आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSU Bank) इंडेक्सला सर्वाधिक फटका बसला. मात्र, मेटल शेअर्समध्ये (Nifty Metal) थोडी सुधारणा दिसून आली.

युद्धाची भीती आणि तेलाचा भडका

बाजार कोसळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ट्रम्प यांनी इराणला दिलेली धमकी. “इराणला उद्ध्वस्त करू” या विधानामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच होर्मुझ समुद्रधुनीतून होणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११० डॉलरवर पोहोचले आहेत. भारतासारख्या आयातदार देशासाठी ही चिंतेची बाब असल्याने गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला.

गुंतवणूकदारांची घालमेल

परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यामुळे बाजारातील वातावरण अधिकच बिघडले आहे. जरी टाटा मोटर्स किंवा आयटीसी सारखे काही शेअर्स स्थिर असले, तरीही एकूणच बाजारातील ‘इंडिया विक्स’ (India Vix) मध्ये २ टक्क्यांची वाढ झाली आहे, जे आगामी काळात बाजार अधिक अस्थिर राहण्याचे संकेत देत आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ