Shantanu Moghe : प्रिया मराठेच्या आठवणीत शंतनू मोघे भावूक

spot_img

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या निधनाने गेल्या वर्षी मोठी पोकळी निर्माण झाली. कॅन्सरशी दीर्घकाळ झुंज देत असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने केवळ प्रेक्षकच नव्हे, तर सहकलाकार आणि जवळच्या व्यक्तींनाही मोठा धक्का बसला.

या कठीण काळात त्यांचे पती आणि अभिनेते शंतनू मोघे यांनीही काही काळ अभिनयापासून दूर राहून पत्नीची काळजी घेतली. मात्र, तिच्या निधनानंतर काही दिवसांनी त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आणि सध्या त्यांच्या ‘मोहिनी’ या मालिकेची चर्चा आहे.

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत शंतनू मोघे यांनी प्रथमच प्रियाच्या आजारपणाबद्दल मोकळेपणाने बोलताना भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, “आयुष्य पुढे चालतच राहते. जे घडलं ते खूप दुर्दैवी होतं. प्रियाने त्या कठीण काळात खूप धैर्य दाखवलं, पण काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. त्या लढाईत आम्ही हरलो.”

ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं आणि त्याची वाटचालही वेगळी असते. आपल्या आयुष्यातील अनुभव स्वीकारत पुढे जाणं हेच महत्त्वाचं आहे, असे त्यांनी नमूद केले.

याशिवाय, त्यांनी प्रियासोबतच्या आठवणीही शेअर केल्या. ‘या सुखांनो या’ या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं, जरी त्यांचे सीन एकत्र नव्हते. तसेच, त्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि ‘एक सफरचंद’ हे नाटक प्रियाला विशेष आवडले होते, असेही त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ